esakal | '18 वर्षावरील लसीकरणासाठी पालिकेला अद्याप लेखी आदेश नाहीत'

बोलून बातमी शोधा

bombay municipal corporation
'18 वर्षावरील लसीकरणासाठी पालिकेला अद्याप लेखी आदेश नाहीत'
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: केंद्र सरकारने सोमवारी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, पालिकेला आजतागायत केंद्र सरकारकडून कोणत्याही मार्गदर्शन सूचना मिळालेल्या नसल्याने नियोजन करण्यात अडचणी येत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत 45 वर्षांच्या वरील लोकांसाठी लसीकरण केले जात आहे. मात्र, देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सगळ्यांचे लसीकरण करण्याची घोषणा केली. मात्र मुंबई महापालिकेकडे लसींचा अपुरा साठा येत असताना 18 वर्षावरील नागरिकांना लस कशी देणार यांची चिंता पालिकेच्या अधिकाऱ्यांना सतावत आहे. तरीही पालिका प्रशासनाकडून याची तयारी केली जात आहे.

हेही वाचा: चांगली बातमी! अखेर 'या' रुग्णांसाठी नायर रुग्णालयाचे दरवाजे खुले

लसीकरण केंद्रांची संख्या, त्यासाठी लागणारे मनुष्य बळ, लागणारा वेळ, ट्रेनिंग आणि त्यासाठीच्या बैठका घेण्याची गरज आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे मिळाली नसल्याने येणारे अडथळे यामुळे नियोजनात अडचणी येत आहेत, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले. एकीकडे महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यांमध्ये लशीच्या तुटवड्याची समस्या असताना, 18 वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरण करायचं म्हटल्यास, इतक्या प्रमाणात लस उपलब्ध होणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे.

56 ठिकाणी लसीकरण केंद्र

18 वर्षावरील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगर पालिका रेल्वे स्थानकांच्या परिसरात लसीकरण केंद्र उभारण्यास प्राधान्य देत आहे. अशी 56 ठिकाणे निश्‍चित करण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असून आवश्‍यक यंत्रणाही तयार करण्यात येणार आहे. सध्या पालिकेचे 39 केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयात 17 आणि खासगी 73 अशी 129 लसीकरण केंद्र आहेत. 

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

bmc does not have written orders vaccination above 18 years of age

हेही वाचा: ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर महाराष्ट्राला कमी पाडला जातोय? - संजय राऊत