पालिकेत निवडणूकघाई!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

मुंबई - अडीच महिन्यांवर आलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता डिसेंबरअखेरीस कधीही लागू होऊ शकते. त्यामुळे धास्तावलेल्या पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांनी गुरुवारी (ता. 24) स्थायी समितीच्या बैठकीत अवघ्या 20 मिनिटांत तब्बल 125 कोटींचे प्रस्ताव मंजूर केले. विशेष म्हणजे, एकापाठोपाठ आलेल्या प्रस्तावांवर चर्चाही झाली नाही की विरोधही झाला नाही. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी स्थायी समितीसमोर येणारे सर्व प्रस्ताव याच धडाक्‍याने मंजूर होण्याची शक्‍यता आहे.

पालिका रुग्णालयांत इसीजी मशीन, आवश्‍यक साहित्य, कामगारांच्या चौक्‍यांची दुरुस्ती, शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, पुलांचे रुंदीकरण, अग्निशमन दलातील वाहनांची बांधणी, महामार्गावर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा पुरवठा, विद्यार्थी गणवेश, पादचारी पूल आदी कामांच्या 125 कोटींच्या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीची मंजुरी मिळाली.
कामगारांना देण्यासाठी कंत्राटदारांकडे पैसे नसल्याने मुंबईतील विकासकामे ठप्प झाली आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने रस्त्यांची कामे कधी होणार, असा प्रश्‍न काही नगरसेवकांनी बैठकीत उपस्थित केला. रस्त्यांची कामे रखडली असल्याने त्यांची सद्यःस्थिती काय आहे, याची माहिती प्रशासनाने द्यावी, असा मुद्दा मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. कामे न झाल्याने कंत्राटदाराची रक्कम राखून ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हा कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्‍नही त्यांनी केला. त्यानंतर या कामांसंदर्भात पुढील बैठकीत माहिती द्यावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला दिले.

Web Title: bmc election