

Mumbai Municipal Election
ESakal
मिलिंद तांबे
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीत यंदा अभूतपूर्व रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. महापालिकेत २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच शिवसेना (ठाकरे गट) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आमनेसामने असून, मुंबईतील ९५ प्रभागांत या दोन पक्षांत थेट सामना होणार आहे. दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून, एकमेकांना रोखण्यासाठी खास डावपेच आखले आहेत.