

BMC Election Thackeray Brothers joint rally
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) या तीन पक्षांची संयुक्त भव्य सभा होणार आहे. या सभेसाठी तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू मुंबईत एकत्र उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे या सभेकडे अवघ्या मुंबईचे लक्ष लागले आहे.