BMC Election: मराठी मतदारांसाठी भाजपची खेळी; मुंबईत मराठी दांडियाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

BMC Election: मराठी मतदारांसाठी भाजपची खेळी; मुंबईत मराठी दांडियाचे आयोजन

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने गुजराती दांडियासोबत आता मराठी दांडियाचेदेखील आयोजन केले आहे. त्यांच्या या घोषणामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर महापालिका निवडणुकात मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(Mumbai BJP Dandiya Program Latest Updates)

काळा चौकी, अभ्युदयनगर परिसरात मराठी दांडियाचे भाजपकडून आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अवधूत गुप्ते यांच्यासारख्या मराठी कलाकारांचा सामावेश आहे. यासाठी नागरिकांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून दररोज १० ते १५ हजार लोक दांडियाचा आनंद घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून "आता भाजपकडून सणामध्येच मराठी गुजराती असा वाद निर्माण केला जात आहे" असा आरोप शिवसेनेने केला आहे.

हेही वाचा: 'ब्राह्मणाने 2017 मध्ये मराठ्यांची झोळी भरली'; तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान

दरम्यान, महापालिकेसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मुंबईत शिवसनेनेला शह देण्यासाठी आणि मराठी मतदाराला आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपकडून अनेक खेळी खेळण्यात येत आहेत. मराठी जनतेसाठी दांडियाचा कार्यक्रम हा त्यातलाच भाग. भाजपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला फायदा होणार का? हे पहावं लागणार आहे.

मुंबईत शिंदे गटाचा महापौर नाही?

गणेशोत्सवादरम्यान अमित शाहांनी मुंबई दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी मुंबईत भाजपचाच महापौर झाला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजपकडून शिंदे गटाचा किंवा शिवसेनेचा उमेदवार महापौरपदासाठी नसणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यानंतर आता भाजपकडून मराठी मतदार वळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत पण महापालिका निवडणुकीत याचा फायदा भाजपला होणार का याकडे लक्ष असेल.