

Mumbai BMC Wealth Drives Fierce Political Competition
Esakal
विष्णू सोनवणे, मुंबई : मुंबई महापालिकेच्या यंदाचा अर्थसंकल्प ७४ हजार कोटी रुपयांचा आहे. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात वाढ होत आहे. पालिकेच्या ठेवी ९२ हजार कोटींवरून ८० हजार कोटींवर आल्या आहेत. पालिकेचा हा आर्थिक डोलारा देशातील इतर महापालिकांच्या तुलनेत मोठा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच श्रीमंत असलेली महापालिका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांची अटीतटीची लढाई सुरू झाली आहे.