

BMC Election
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : इतर महापालिकेच्या तुलनेत मुंबईत बंडखोरीचे प्रमाण तसे कमी आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अनेक बंडखोरांनी आपली तलवार म्यान केली. मात्र तरीही अनेक प्रभागांत बंडखोर रिंगणात आहेत. सर्वाधिक आठ बंडखोर ठाकरे गटात, तर त्या खालोखाल भाजपमध्ये पाच जणांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांमुळे युती-आघाडीमध्ये मतविभाजनाचे संकट कायम आहे.