

BMC Result Live Updates First Trends After Postal Vote Counting
Esakal
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवसेनेची सत्ता येईल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. मुंबईत टपाल मतमोजणी सुरू झाली आहे. टपाली मतदान मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशिनची मोजणी सुरू झालीय. मुंबईत पोस्टल मतमोजणीनंतर हाती आलेल्या पहिल्या कलानुसार भाजपने जोरदार आघाडी घेतली होती. मात्र नंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांनीही जोरदार मुसंडी मारलीय. पहिल्या दीड तासात मुंबईत ठाकरे बंधूंना २५ जागांवर तर महायुतीला ३९ जागांवर आघाडी मिळालीय. तर राष्ट्रवादी अजित पवार गट एक आणि काँग्रेसचे पाच उमेदवार आघाडीवर आहेत.