

Shinde Sena Wins Only 29 Of 90 Seats In BMC Polls
Esakal
मुंबई, ता. १६: ठाणे, कल्याण-डोंबिवलीप्रमाणे शिवसेनेला मुंबईत आपला जम बसवता आला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते. या वेळी मुंबई महापालिकेच्या निकालात हे प्रकषनि दिसून आले. मुंबईत ९० जागा लढवलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला विजयाचा 'स्ट्राइक रेट' राखता आला नाही. ठाकरे गटाच्या गोटातून फोडलेल्या ६२ नगरसेवकांपैकी केवळ २९ उमेदवारांना विजय मिळवता आला; मात्र शिवसेनेला सोबत घेतल्याचा फायदा शिंदेऐवजी भाजपला जास्त झाल्याचे चित्र आहे.