Eknath Shinde
Eknath Shindeesakal

शिवसेनेच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार, शिंदेंच्याच पदाधिकाऱ्याची हायकोर्टात याचिका

BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग ११९ मधून निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे राजेश सोनावळे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिंदेंच्याच पदाधिकाऱ्यानं त्यांच्याविरोधात याचिका दाखल केलीय.
Published on

मुंबई, ता. २४ : प्रभाग ११९ मधून निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे राजेश सोनावळे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सोनावळे यांची उमेदवारी रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयासह लघुवाद न्यायालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, सोनावळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांचे वकील अॅड. आश्विन भागवत यांनी याचिकेतील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com