esakal | धोकादायक इमारत सोडण्यास रहिवाशांचा विरोध; म्हाडा दोन इमारती पाडणार
sakal

बोलून बातमी शोधा

mhada

धोकादायक इमारत सोडण्यास रहिवाशांचा विरोध; म्हाडा दोन इमारती पाडणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : म्हाडाच्या (Mhada) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने यंदा २१ अतिधोकादायक इमारतींचीही यादी (Risky building list) जाहीर केली. धोकादायक इमारतींमधील काही रहिवाशांना सुरक्षित (people safety) ठिकाणी हलवण्यात आले आहे; मात्र अद्याप दोन धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी घराबाहेर निघण्यास विरोध केला आहे, परंतु जीवाला धोका असल्याने दोन इमारती पडणार (building demolish) असल्याची नोटीस (notice) मंडळाने रहिवाशांना दिली आहे.

हेही वाचा: राज्यावर भारनियमनाचे संकट गडद

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत १४ हजार ७५५ उपकरप्राप्त इमारती जुन्या आणि जीर्णावस्थेत आहेत. दरवर्षी या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार यंदा २१ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. या इमारतींमध्ये ४६० निवासी व २५७ अनिवासी रहिवासी, भाडेकरू आहेत. यापैकी २३६ निवासी भाडेकरू, रहिवाशांनी स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे.

पहिल्या टप्प्यांतर्गत ४७ भाडेकरू, रहिवाशांना या संक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी केवळ १६ भाडेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे; तर इतरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, धोकादायक इमारतीच्या यादीमधील बावला टॅंक येथील महम्मद चाळ आणि मॅक्सी बिल्डिंगमधील ६४ रहिवासी कागदपत्रे देत नाहीत.

हेही वाचा: फ्लेमिंगो अभयारण्याच्या बफर झोनच्या नियमावलीत बदल

या इमारतींमधील केवळ १० ते १२ रहिवाशांनी पर्यायी घरासाठी म्हाडाकडे कागदपत्रे दिली आहेत. परतीचा पाऊस सुरू झाला तरी रहिवासी इमारतीतून बाहेर पडण्यास नकार देत नसल्याने अखेर मंडळाने या दोन इमारती पाडण्याची नोटीस दिली आहे. या दोन इमारतींमधील रहिवासी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले नाही.

"सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी वारंवार मागणी केल्यानंतरही काही भाडेकरू कागदपत्रे देत नाहीत. काही रहिवासी न्यायालयात गेले आहेत. धोकादायक इमारतीमधून बाहेर पडण्यास भाडेकरू तयार नाहीत. त्यामुळे या इमारती पाडण्याची नोटीस देण्यात आली आहे."
- अरुण डोंगरे, मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

loading image
go to top