

BMC Election
ESakal
विनोद राऊत
मुंबई : प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराचा धुरळा उडताना दिसत नाही. या वेळी युती आणि आघाडीत बिघाडी झाली आहे. तब्बल १९ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघेल, आरोप-प्रत्यारोपाला धार चढेल, अशी सर्वांची अपेक्षा होती; मात्र प्रचार शांतपणाने सुरू आहे. मुंबईकर, विशेषत: मराठी माणूस शांत असल्याचे चित्र आहे.