

Mumbai Traffic Restrictions
ESakal
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत १५ जानेवारी रोजी होणाऱ्या बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आजपासून शहरातील अनेक भागात वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. काही रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे. १७ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या वाहनांच्या वाहतुकीसाठी काही रस्ते तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.