esakal | BMC ने घेतला कोरोनाचा धसका, मुंबईत गेल्या तीन दिवसात तब्बल ५० हजार तपासण्या

बोलून बातमी शोधा

BMC ने घेतला कोरोनाचा धसका, मुंबईत गेल्या तीन दिवसात तब्बल ५० हजार तपासण्या}

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सध्या लॉकडाउन लावण्याची गरज नाही

mumbai
BMC ने घेतला कोरोनाचा धसका, मुंबईत गेल्या तीन दिवसात तब्बल ५० हजार तपासण्या
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई, 26 : कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत असताना मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, असे जरी असले तरी गेल्या तीन दिवसांत चाचण्यांचे प्रमाण वाढले असून तब्बल 50 हजार चाचण्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे, वाढलेल्या वेगाने पसरणाऱ्या कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे गरजेचे असून यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे.

शिवाय, पुढचे 10 दिवस कोरोनाच्या दृष्टीकोनातुन मुंबईसह महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे, लोकांनी कोविडसाठीचे घालून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन ही अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, वाढलेल्या कोविडच्या केसेसचा धसका घेऊनच चाचण्या वाढवल्या असून 50 हजारांच्या चाचण्यांमध्ये जवळपास 3 हजार पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मुंबईसह राज्यात तीन महिन्यांनंतर कोविड 19 च्या केसेसमध्ये एका दिवसांतच मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढलेली दिसली. त्यानंतर, नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले नाही तर महाराष्ट्र आणि मुंबईसाठी पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतील, असा इशारा अधिकारी आणि तज्ज्ञांनी दिला.

महत्त्वाची बातमी : राज ठाकरेंच्या 'त्या' कार्यक्रमाला मुंबई पोलिसांचा नकार, पाठवली नोटीस

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यासह मुंबईत केल्या जाणाऱ्या आक्रमक चाचण्यांमुळे प्रकरणे वाढली आहेत. परंतु यावेळी कोरोनाव्हायरसच्या प्रोटोकॉलचा सर्वांनीच गंभीरपणे विचार केला पाहिजे. शिवाय सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना केसेस रोखण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना असे आवाहन केले आहे की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे आणि सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करावे अन्यथा प्रकरणे वाढतील जे दुसर्‍या लाटेसाठी प्रमुख कारण ठरेल आणि निर्बंध हा शेवटचा पर्याय असेल.

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सध्या लॉकडाउन लावण्याची गरज नाही. कारण, चाचण्यांचे प्रमाण आणि संपर्क ट्रेसिंगची संख्या वाढल्यामुळे प्रकरणे वाढल्याचे  दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत शहरात 50 हजारांहूनअधिक कोविड चाचणी करण्यात आल्या असून त्यापैकी जवळपास 3000 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद केली ज्याचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

"आम्ही नागरिकांना कोव्हीड प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे आवाहन करत आहोत कारण, जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात ज्या प्रकारे केसेस वाढले होते आणि जी परिस्थिती ओढावली होती. तिच परिस्थिती आता नको आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून सर्व प्रोटोकॉल कठीण केले आहेत आणि सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रांत जर रुग्णसंख्या वाढली तर कडक कारवाई करण्याच्या सुचना केल्या आहेत," असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाची बातमी :  के सी वेणुगोपाल यांनी काढलं पत्रक, मुंबई काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याबाबत मोठी बातमी

कोविड -19 साठी महाराष्ट्र सरकारचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की ही दुसरी लाट आहे की नाही हे सांगणे फार कठीण आहे. परंतु, नागपूर, अमरावती ते औरंगाबाद येथून सुरू होणाऱ्या विदर्भासारख्या काही भागात विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे.  आता हळूहळू हा विषाणू पुणे आणि मुंबईसारख्या इतर जिल्ह्यांमध्ये संक्रमित होत आहेत, जर आपण आताच नियंत्रण ठेवले नाही तर तो देशातील इतर राज्यात वेगाने पसरण्यास वेळ लागणार नाही.

आरोग्य तज्ञ म्हणतात की, सध्याची रणनीती पुरेशी आणि प्रभावी असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याही नव्या रणनीतीची आवश्यकता नाही. “ लॉकडाउन हा शेवटचा उपाय आहे. “मायक्रो-कंटेन्ट झोन” स्थापित करणे, प्रतिबंधित भागात निर्बंध, संपर्क-शोध आणि चाचण्या वाढवणे आणि सक्रिय प्रकरणांचे आयसोलेशन करणे ही काही महत्वाची पावले आहेत ज्यामुळे विषाणूचा प्रसार रोखता येऊ शकेल. ”

BMC emphasizing on corona testing 50 thousand test done in last three days