
BMC Exam 2025 Marathi News : बृहनमुंबई महानगरपालिकेत अभियंतापदासाठी येत्या रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे. पण अर्ज केलेल्या उमेदवारांना थेट भंडारा, नागपूरमधील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळं अशा गैरसोयीच्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता आहे, त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटरमध्येच घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.