esakal | BMC: असा भरा 'ऑनलाईन' मालमत्ता कर
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMC: असा भरा 'ऑनलाईन' मालमत्ता कर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: कोविडच्या पार्श्वभुमीवर 2021-22 या वर्षात जुन्याच दराने मालमत्ता कर वसुल करण्यास आज महानगर पालिकेच्या स्थायी समितीने मंजूरी दिली. त्यानंतर तत्काळ मालमत्ता कराची बिले निर्गमित करण्यात आली आहे. हे बिल प्रत्यक्ष पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात तसेच ऑनलाईनच्या विविध पर्यायांचा वापर करुन भरात येणार आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा: धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध - ATS प्रमुख

पालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर बिल उपलब्ध असून त्यांचे अधिदान या संकेतस्थळावर तसेच पालिकेच्या मोबाईल अॅपद्वारे देखील करता येणे शक्य आहे. पालिका संकेतस्थळावर पेमेंट गेटवे पद्धतीने देयक भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा यांच्या पेमेंट गेटवे माध्यमातून विनाशुल्क देयके भरता येतील.

त्यात नेट बँकींग, यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट वॉलेट या पर्यायांचा देखील अवलंब करता येईल. सिटी बँकच्या पेमेंट गेटवे माध्यमातून प्रति वापर 20 रुपये शुल्क आकारुन देयके भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये नेट बँकींग हा एकच पर्याय उपलब्ध आहे. एसबीआयच्या व्हर्च्युअल अकांऊट नंबरवरुन एनईएफटी आणि आरटीजीएस, एसबीआय टू एसबीआय पर्याय मार्फत करता येईल. ऍंड्रॉइड, आयओएस आधारित मायबीएमसी 24 x 7 या अॅप वरुन नेट बँकिंगसह यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट वॉलेट या पर्यायांने विनामुल्या कर भरता येईल.

एनईएफटी आणि आरटीजीएससाठी हे करा

एनईएफटी आणि आरटीजीएस करण्यासाठी हे करा करदात्याचे खाते क्रमांक मालमत्ता कर देयकांवर नमूद मालमत्ता धारकाचा 15 अंकी लेखा क्रमांक लिहावा लागेल. या १५ अंकी क्रमांकाआधी एमसीजीएमपीटी - मालमत्ता करासाठी, एमसीजीएमपीआर-दुरुस्ती उपकरासाठी, एमसीजीएमजीपी-जीपीआर मालमत्तांसाठी यापैकी योग्य लागू असेल तो संक्षिप्त शब्द नमूद करावा लागेल. त्यानंतर लाभार्थ्यांचे नाव -एमसीजीएम इंग्रजीत लिहून अकरा अंकी आयएफएससी संकेतांक एसबीआयएन0000300, बँक एसबीआय शाखा मुंबई मेन ब्रॉच, खाते चालू (करंट) असा तपशील लिहावा.

loading image
go to top