कुणी मेमरी कार्ड देतं का मेमरी कार्ड..

कुणी मेमरी कार्ड देतं का मेमरी कार्ड..

मुंबई - पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महापालिकेकडून टॅब देण्यात आले आहेत. मात्र सुमारे 40 हजार टॅबमधील काही टॅब नादुरुस्त झाल्याने बंद तर बहुतांश टॅब मेमरीकार्ड नसल्याने वापराविना पडून आहेत. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना टॅबची प्रतीक्षा करावी लागत आहे. 

पालिका शाळेत जाणारी मुले ही बहुतांश झोपडपट्ट्या आणि चाळींमधून येत आहेत. या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पहिल्या वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांपासून टॅब देण्याची योजना सुरु करण्यात आली. मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. मात्र या योजनेचा बोजवारा उडाला आहे.

सुमारे 40 हजार टॅब इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र यातील बहुतांशी टॅब सद्या बंद असल्याने पडून आहेत. काही टॅबमध्ये एसडी कार्ड नसल्याने त्याचा उपयोग होत नसल्याने हे टॅबही वापराविना पडून आहेत. इयत्ता 10 वीची परीक्षा जवळ आली असतानाही टॅब नसल्याने अभ्यास करताना विद्यार्थ्यांची गैरसोय होते आहे.

शैक्षणिक वर्ष संपत आले असताना या टॅबच्या दुरुस्तीसाठी नवे कंत्राट देण्याचा विचार सुरू आहे. मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी टॅब दिले जातात. मात्र अभ्यासासाठी मुलांना त्याचा वापर होतच नसेल तर ते गंभीर असल्याचे सांगत यावर शिक्षण समितीत सदस्यांकडून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते.

टॅब देण्याचा उद्देश सफल होत नसेल तर हा उपक्रम राबवून उपयोग काय असा सवालही नगरसेवकांनी विचारला. मात्र टॅबची सद्यस्थिती काय आहे, याबाबत प्रशासनाला उत्तर देता आले नव्हते. त्यामुळे टॅब योजनेत काही तरी गोंधळ आहे, असा संशयही नगरसेवकांकडून व्यक्त केला आहे. मात्र त्या नंतरही टॅब दुरुस्त होऊन मुलांच्या हातात आले नसल्याने मुलांची गैरसोय झाली असल्याचे काही पालकांकडून सांगण्यात आले. 

bmc gave tabs to the students without sd memory card

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com