मोठा गौप्यस्फोट : 2014 मध्येच आलेला महाविकास आघाडीचा प्रस्ताव, शिवसेना म्हणते..  

सकाळ वृत्तसंस्थ
Monday, 20 January 2020

मुंबई - कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीबद्द्ल एक अत्यंत मोठा गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेने २०१४ मध्येच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट काँग्रेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. 

मुंबई - कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीबद्द्ल एक अत्यंत मोठा गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेने २०१४ मध्येच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट काँग्रेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. 

यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मालिक यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने कॉंग्रेसला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत येण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र कॉंग्रेसने हा प्रस्ताव फेटाळला होता असं पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलं होतं. राजकारणात हार-जीत होतंच असते. मात्र, आम्ही निवडणूक हरल्याने विरोधी बाकावर बसणार हेच त्यावेळी त्यावेळी स्पष्ट झालं होतं. आताही शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्यास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी ही भूमिका घेतली असं चव्हाण यांनी सांगितलं होतं. मात्र या सगळ्या गोष्टीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवाब मालिक यांनी स्पष्टीकरण देत पृथ्वीराज चव्हाणांच्या सर्व दाव्यांना फेटाळून लावलंय.

मोठी बातमी - गुन्हा कराल तर घोडा लागेल पाठी, मुंबई पोलिस घोड्यावरून करणार गुन्हेगारांचा पाठलाग..
 
काय म्हणले नवाब मालिक:

काँग्रेस एक वेगळा पक्ष आहे. शिवसेनेचं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बोलणं झालं असेल पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नव्हतं. कॉंग्रेसला प्रस्ताव आला असावा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला असा कोणताही प्रस्ताव आला नव्हता, असं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलंय. एकूणच पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा खरा आहे की नवाब मालिक यांचं स्पष्टीकरण खरं ? हा एक मोठा प्रश्न आहे.

मोठी बातमी -  वर्षभरानंतर श्रीनिवास परदेशातून आला आणि त्यांच्यात झालं...

शिवसेनेची बाजू : 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शिवसेनेकडून आता अनिल परब यांनी भाष्य केलंय. हा प्रस्ताव देताना कोण कोण उपस्थित होतं त्यांची नावं उघड करावीत असं शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलंय. याबद्दल पृथ्वीराज चव्हाणच अधिक माहिती देऊ शकतात,” असं देखील अनिल परब यांनी म्हटलं आहे.
 

shivsena wanted to form mahavias aaghadi in 2014 says pruthviraj chawan 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena wanted to form mahavias aaghadi in 2014 says pruthviraj chawan