रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आता BMC सर्वांना देणार 'हे' औषध...

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आता BMC सर्वांना देणार 'हे' औषध...

मुंबई : मुंबईतील नागरीकांबरोबरच महापालिकेच्या अलगिकरण केंद्रातील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम या होमिओपथिक गोळ्या देण्यात येणार आहेत. मुंबईची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

धारावी आणि वरळी कोळीवाड्यातील नागरीकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महापालिकेने तेथील निरोगी नागरीकांना हायड्रोक्लोरोक्विनचे औषध देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या औषधांचे साईड इफेक्ट असल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

आरजू स्वाभीमान नागरी समितीने अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपथिक गोळ्या नागरीकांना तसेच हायरिस्क व्यक्तींना देण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली होती. त्यानुसार पालिकेने परवानगी दिली असूूून काही विभागांमध्ये या औषधांचे वितरणही करण्यात आले असल्याचे समितीचे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांनी सांगितले. तर, उद्यापासून जी उत्तर म्हणजेे धारावी, माहिम दादर परीसरात या औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. 

जी उत्तर विभागात या औषधांचे वितरण करण्याची परवानगी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर यांनी दिली आहे. ( या परवानगीचे पत्र सकाळ कडे उपलब्ध आहे)  

नागरीकांना ऐच्छिक 

पालिकेने हे औषध वितरीत करण्यास परवानगी दिली असली तरी त्याचे सेवन करायचे का नाही हे नागरीकांनी ठरवायचे आहे. सेव्हन हिल रुग्णालयात काही रुग्णांना हे औषध देण्यात आले होते. त्याचा चांगला परीणाम दिसून आला होता. असे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले.

आयुष मंत्रालयाची शिफासर 

या औषधांची शिफासर आयुष मंत्रालयानेही केली आहे. तसेच केरळमध्येही औषध देण्यात आल्याचे राजेंद्र मेहता यांनी सांगितले. संपुर्ण मुंबईत हे औषध वितरीत करायचे असल्यास 10 कोटी रुपयांची गरज आहे. तीन दिवसात12 गोळ्यांंचे सेवन केल्यास महिनाभर त्याचा परीणाम राहतो. 

BMC to give arsenicum album 30 to improve immunity of citizens of mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com