इमारती सील करण्याबाबत महापालिकेनं घेतला 'हा' मोठा निर्णय..नागरिकांना मिळणार दिलासा..  

sealed
sealed
Updated on

मुंबई: कालपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेनं आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यात मुख्यतः इमारत सील करण्याबाबतचे नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. 

एखादा कोरोना रुग्ण सापडल्यावर संपूर्ण सोसायटी किंवा इमारत सील करण्याची गरज नसल्याचं बीएमसीनं स्पष्ट केलं आहे. घटनास्थळाची परिस्थिती पाहून एक मजला किंवा त्यातील एक भाग सील करण्याबाबत अधिकारी येत्या एक- दोन दिवसात निर्णय घेऊ शकतात, असंही पालिकेनं सांगितलं आहे. 

जर कोरोना रुग्ण आढळला आणि त्याच एक मजली घर असेल तर ते पूर्णपणे सील करण्यात येईल. पण बहुमजली इमारत असेल तर एक मजला सील केला जाईल. पूर्ण इमारत सील करण्याची गरज नसून लोकांनी स्वतःच काळजी घेणं अपेक्षित असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. बहुमजली इमारतीमध्ये रुग्ण सापडल्यास रुग्णाचं घर आणि संबंधित क्षेत्राचं निर्जंतुकीकरण करण्यात येईल. तसंच सोसायटीशी चर्चा करुन ते क्षेत्र सील केलं जाईल असं ठरवण्यात आलं आहे. 

बीएमसीकडून नियमात तिसरा बदल:

कंटेन्मेंट झोन परिसर धोरणातील हा बीएमसीकडून करण्यात आलेला तिसरा बदल आहे. एखाद्या मोठ्या वसाहतीत रुग्ण सापडल्यास फक्त ती इमारत सील केली जाईल, असा बदल महापालिकेनं एप्रिलमध्ये केला होता. गेल्या आठवड्यात कंटेन्मेंट झोनमधील छोटे छोटे भाग मोकळे करुन यंत्रणेकडून त्या भागांवर नजर ठेवली जाईल, असा बदल नवे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला. दोन दिवसांपूर्वीच आयुक्त चहल यांनी कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्त 'सीलबंद इमारती' ही एक वर्गवारी तयार केली. या वर्गवारीत या सीलबंद इमारतीत नियमांचे काटेकोरपालन करण्यासाठी सोसायटीचा सहभाग घेतला जाणार आहे.

एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एखादा बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण आढळून आलं असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला 'सीलबंद इमारत' म्हणून घोषित करण्यात येणार आहे. हे करताना बाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण राहत असलेल्या सदनिकेची आणि इमारतीची परिस्थिती लक्षात घेऊन सदर इमारत किंवा इमारतीचा काही भाग 'सीलबंद' म्हणून घोषित करण्यात येईल.

BMC has changed its decision again regarding sealing of buildings read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com