कोरोना संसर्गाची व्याप्ती समजून घेण्यासाठी होणार 'सिरो-सर्व्हे', जाणून घ्या 'सिरो-सर्व्हे' म्हणजे काय?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये होणार सर्व्हे

मुंबई : कोरोना संसर्गाची व्याप्ती समजून घेण्यासाठी सिरो सर्वे करण्याचा निर्णय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घेतला आहे. कंटेन्मेंट किंवा क्लस्टर झोन मधील लोकांच्या रक्ताची चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून संसर्ग प्रसाराची कारणे, विषाणूंच्या संक्रमणाची मात्रा, संसर्ग बरा होण्याचे प्रमाण शोधले जाणार आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) नवी दिल्ली यांनी देशभरातील कोरोना संसर्ग अधिक असलेल्या राज्यांमध्ये हा सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक राज्यातील कंटेन्मेंट किंवा क्लस्टर झोन अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये हा सर्वे करण्यात येणार आहे. जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या 10 समुहातील प्रत्येकी 40 जणांची अशी एकूण 400 लोकांच्या रक्ताची तपासणी  राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट

रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा ( ऍन्टीबॉडी) शोध या प्रकारे घेण्यात येणार आहे. कोविड19 प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होईल. 

'आयसीएमआर'ने देशातील 21 राज्यातील 69 जिल्ह्यांमध्ये कोविड19 च्या अनुषंगाने समाजाधारित सिरोसर्व्हे करण्याचे निश्चित केले आहे. या 69 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या सहा जिल्ह्यांतील कंटेन्मेंट झोन तसेच क्लस्टर झोन निवडले जाणार आहेत. त्यासाठी भिन्न लिंग, वय, शारीरिक क्षमता, कोविड, नॉन कोविड अश्या व्यक्तीची रँडमली निवड केली जाणार आहे. त्यांच्या रक्त चाचणीतून येणारे निष्कर्ष नोंदवले जाणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भाजपचं राज्यभर 'महाराष्ट्र बचाओ आंदोलन'

त्यातून निघणाऱ्या निष्कर्षानुसार कोरोनावरील पुढील उपाययोजना ठरविण्यासाठी मदत होणार आहे. आयसीएमआरच्या माध्यमातून हा सर्वे होत असून स्थानिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. सदर सर्वेक्षण पार पाडण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नवी दिल्ली, राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्था, चेन्नई आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र, चेन्नई या संस्था आवश्यक तांत्रिक सहकार्य करत आहेत.

ICMR to conduct sero survey to estimate prevalence of covid 19 infection


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICMR to conduct sero survey to estimate prevalence of covid 19 infection