

BMC Health Chatbot Service
ESakal
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्यसेवा अधिक सोप्या, पारदर्शक आणि नागरिकांना सुलभ करण्यासाठी "बीएमसी हेल्थ चॅटबॉट" सेवा सुरू केली आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी ही डिजिटल सेवा सुरू केली. आरोग्यसेवा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीच्या दिशेने बीएमसीने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.