

BMC Hospital
ESakal
मुंबई : महापालिकेच्या केईएम, शीव व नायर या तीन महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, परिसेविका, सफाई कर्मचारी, कक्ष परिचर अशी विविध कर्मचाऱ्यांची तब्बल ४५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेने रुग्णालयांचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) खासगीकरण करण्याऐवजी रिक्त पदे भरून आरोग्यसेवा बळकट करावी, असे सूचनावजा आवाहन ‘जन आरोग्य हक्क अभियान’, ‘रुग्णालये वाचवा खासगीकरण थांबवा कृती समिती’, ‘म्युनिसिपल युनियन’ आणि ‘पॅरामेडिकल युनियन’ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.