BMC Action: 'त्या' कंत्राटदारांना ९.२५ कोटींचा दंड! एआय प्रणालीचा वापर, बिलांमधून दंडाची वसुली सुरू

Mumbai Drain Cleaning Work: नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांच्या हलगर्जीवर महापालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. पालिका प्रशासनाकडून कंत्राटदारांना नऊ कोटी २५ लाख ७२ हजार ८३० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on

मुंबई : महानगरातील नाले स्वच्छतेच्या कामात कंत्राटदारांकडून झालेल्या हलगर्जीवर महापालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. नालेसफाईच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीच्या माध्यमातून शोधण्यात आलेल्या विविध त्रुटी आणि यंत्रसामग्री तैनात करण्यास झालेल्या विलंबाबद्दल कंत्राटदारांना नऊ कोटी २५ लाख ७२ हजार ८३० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही दंडात्मक रक्कम कंत्राटदारांच्या देयकांमधून (बिल) वसूल केली जात आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com