Mumbai News: पदभरतीसाठी हालचाली, महापालिका ‘त्या’ वरिष्ठ प्रशासकीय जागा भरणार
BMC Hospital: महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधील वरिष्ठ प्रशासकीय रिक्त पद भरतीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णालयांचा कारभार सुधारण्यास मदत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या उपनगरीय रुग्णालयांमधील रिक्त असलेल्या वरिष्ठ प्रशासकीय पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.