मिनी पंपिंगने कलानगर वाचवले, आता मुंबईतील पुराचा अभ्यास होणार 

समीर सुर्वे
Thursday, 24 September 2020

दक्षिण मुंबईतील अनेक भागात पाणी साचलेले असताना 290 मिमी पेक्षा जास्त पाऊस होऊनही वांद्रे येथील कलानगर बरोबरच त्या परीसरातील भागात पाणी साचले नव्हते.

मुंबई,ता.24: मंगळवार रात्रीच्या पावसात मुंबईतील अनेक भागात साचलेल्या पाण्याची कारणं मुंबई महापालिका शोधणार आहे.यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसासह मंगळवारच्या पावसातही दक्षिण मुंबईतील अनेक भागांना फटका बसला आहे.यातील काही भागात पाणी साचण्याची घटना अत्यंत दुर्मिळ आहे.

दक्षिण मुंबईतील अनेक भागात पाणी साचलेले असताना 290 मिमी पेक्षा जास्त पाऊस होऊनही वांद्रे येथील कलानगर बरोबरच त्या परीसरातील भागात पाणी साचले नव्हते. या भागात पालिकेने मिनी पंपिंग स्टेशन तयार केले असून त्याचा हा परीणाम मानला जात आहे.

महत्त्वाची बातमी : शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

दक्षिण मुंबईतील ग्रॅन्टरोड, गोल देऊळ, मुंबई सेंट्रेल वरळी सी फेस तसेच अनेक भागात काल प्रचंड पाणी साचले होते. या भागात पुर्वी पाणी साचले तरी त्याचा निचरा वेगाने होत होता. तसेच परळ टिटी परीसरात दरवर्षी पाणी साचत असले तरी दामोदर हॉलमध्ये पाणी शिरणे ही दुर्मिळ घटना आहे. मंगळवारी रात्री कमी वेळात जास्त पाऊस झाला काही ठिकाणी तर तासाला 100 मिमी पर्यंत पाऊस नोंदविण्यात आला. त्यामुळे पाणी साचले होते. मात्र, तरीही ज्या भागात पाणी साचले त्या भागांची पाहाणी करुन तेथील पर्जन्य वाहीन्यांचा आढावा घेतला जाणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले.

कलानगरचा परीसर हा समुद्र सपाटिच्या खाली असल्याने तेथे दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचायचे. मात्र, पालिकेने यंदा या ठिकाणी मिनी पंपिंग स्टेशन तयार केले आहे. वांद्रे कुर्ला संकुलाजवळ हे पंपिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे. या मिनी पंपिंगमधून मिनीटाला 49 हजार 800 लिटर पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे कलानगर, इंदिरानगर तसेच परीसरात यंदा ऑगस्टसह सप्टेंबरच्या पावसातही पाणी साचण्याची समस्या जाणवली नाही.

( संपादन - सुमित बागुल ) 

bmc to investigate reason of mumbai floods mini pumping station helped kalanagar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc to investigate reason of mumbai floods mini pumping station helped kalanagar