रस्त्यांवर खड्डे दिसताहेत, हा घ्या पालिकेचा व्हॉटसअॅप नंबर...

रस्त्यांवर खड्डे दिसताहेत, हा घ्या पालिकेचा व्हॉटसअॅप नंबर...

मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव सर्वाधिक मुंबई शहरात आहे. अशातच सध्या लॉकडाऊन असल्यानं सर्वच कामं खोळंबली आहेत. पावसाचं आगमनही मुंबईत आधीच झालं आहे. मात्र मुंबईतल्या रस्त्यांवरचा खड्ड्यांचा प्रश्न अद्याप काही सुटलेला दिसत नाही. यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई खड्ड्यात असे चित्र पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा आला की, मुंबईतल्या रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण होतात. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते. या खड्ड्यांमधून नागरिकांना तारेवरची कसरत करुन मार्ग शोधावा लागतो. त्यातच या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, अपघात यासारख्या गोष्टी घडतात. आता यालाच पर्याय म्हणून मुंबई महापालिकेनं एक खास उपाययोजना केली आहे. 

मुंबई महापालिकेनं नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून व्हॉटसअॅपची सेवा सुरु केली आहे. यासाठी पालिकेनं खास व्हॉट्सअॅप नंबर जाहीर केला आहे. गेल्यावर्षी बीएमसीनं एक अॅप देखील लॉन्च केलं होतं. 

पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवर खड्डा दिसला की तुम्ही व्हॉटसअॅपच्या माध्यमातून तक्रार करु शकता. असं पालिकेनं म्हटलं आहे. असे आदेशचं पालिकेनं दिलेत. यासाठी महापालिकेकडून 24 वॉर्डांमधील इंजिनिअर्सचे व्हॉट्सअॅपनंबर नागरिकांसाठी उपलब्ध केलेत. 

कशी नोंदवू शकता तक्रार 

तुम्ही खड्ड्यांबाबत एकदम सोप्या पद्धतीनं ही तक्रार नोंदवू शकणार आहात. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे दिसल्यास नागरिकांनी त्या खड्ड्याचा फोटो काढायचा आणि त्यानंतर महापालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करायची. हॉट्सअॅप शिवाय खड्ड्यांशी संबंधित तक्रारींचे निर्देश देण्याशिवाय, पालिकेच्या टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकावर देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकणार आहात. 

या क्रमांकावर 1800-221 आपणास MCGM 24/7 अॅपद्वारे -293 वर सकाळी 9 ते संध्याकाळी 9 या वेळेत तुम्हाला संपर्क साधता येईल.

रस्ता अभियंत्यांचे व्हॉट्सअॅप नंबर शेअर करण्याचा निर्णय नागरिकांना मदत करण्यासाठी घेण्यात आलेला आहे. नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर 48 तासांत खड्ड्यांची समस्या दूर होईल, असं पालिका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com