esakal | कोरोना नियंत्रणासाठी धारावीत जम्बो क्वारंटाईन सेंटर; किती खाटा असणार आहेत? 
sakal

बोलून बातमी शोधा

quarantine.

मुंबई शहरात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या धारावीत प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. दाटीवाटीची लोकवस्ती असल्याने होम क्वारंटाईनचा पर्याय धारावी सारख्या परिसरात लागू होत नाही आहे.

कोरोना नियंत्रणासाठी धारावीत जम्बो क्वारंटाईन सेंटर; किती खाटा असणार आहेत? 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहरात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या धारावीत प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. दाटीवाटीची लोकवस्ती असल्याने होम क्वारंटाईनचा पर्याय धारावी सारख्या परिसरात लागू होत नाही आहे. त्यामुळे पालिकेने परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत होईल. 

मोठी बातमी ः लॉकडाऊनचा असाही सदुपयोग; कासारवाडी ग्रामस्थांनी धरली स्वच्छतेची कास

त्यामुळे अधिकाधिक प्रमाणात क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाापालिकेने धारावी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी ही सुविधा मिळत आहे. काही दिवसांतच धारावीत कोरोनाच्या रुग्णासाठी 4 हजार 407 खाटांची क्षमता क्वारंटाईनसाठी उपलब्ध होत आहे. या सर्व ठिकाणांची महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. यामुळे धारावी भागातील क्वारंटाईनचा दर आणि वेग वाढवणे शक्य झाले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

मोठी बातमी ः ठाणे जिल्ह्यातील 'हे' योद्धे कोरोनाच्या विळख्यात; विशेष कक्षही केला तयार

कोरोना काळजी केंद्र 1 अंतर्गत 3 हजार 740 खाटांच्या क्षमतेची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये माहिम निसर्गोद्यान समोरील 35 हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर 200 खाटांच्या जम्बो फॅसिलीटीचाही समावेश आहे. या जम्बो फॅसिलीटीमध्ये प्रत्येक खाटावर ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असेल. कोरोना काळजी केंद्र 2 (सीसीसी 2) अंतर्गत 667 खाटांची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. सीसीसी 1 आणि सीसीसी 2 मिळून एकूण 4 हजार 407 खाटांची क्षमता अलगीकरणासाठी उपलब्ध होत आहे. यामुळे धारावी भागातील अलगीकरणाचा दर व वेग वाढवणे शक्य झाले आहे. असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला. 

मोठी बातमी ः ...म्हणून म्हाडाच्या रखडलेल्या प्रकल्पांना देण्यात आली परवानगी!

आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्या नंतर धारावी परिसरात काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त चहल यांनी भेट दिली होती.  संस्थात्मक अलगीकरण वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही गतीने करण्यात येत आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या 1 हजार 240 खाटांच्या क्षमतेच्या कोरोना काळजी केंद्र 2,  व्यवस्थेची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांनी केली. यावेळी त्यांच्यासह सहआयुक्त आयुक्त (दक्षता) आशुतोष सलील यांनी शनिवारी (ता.२३) पाहणी केली आणि प्रगतीचा आढावा घेतला.