

Mayor Reservation Draw May Turn Tables In BMC Politics
Esakal
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत गुरुवारी २२ जानेवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये महापौर पदासाठी चुरस आहे. नगरविकास विभागाकडून आरक्षण सोडतीबाबत पत्रक जारी करण्यात आलंय. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाणार आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौरपदाचा ट्विस्ट वाढण्याची शक्यता आहे. जुन्या चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढली तर भाजप आणि शिंदे सेनेकडे तसा नगरसेवकच नाहीय.