

BMC Mayor Election
ESakal
मुंबई : मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ३१ जानेवारीला घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. २२ जानेवारीला आरक्षण सोडत पार पडल्यानंतर ३१ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक घेतली जाणार आहे. महापौर विराजमान झाल्यानंतर त्याच दिवशी उपमहापौर, सभागृह नेता, गटनेत्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.