पालिकेकडून ज्येष्ठ नागरिक बेदखल, पुन्हा तक्रारची दखल घेणार नसल्याचे गर्विष्ठ उत्तर

तेजस वाघमारे
Thursday, 5 November 2020

बोरिवली पुर्वेकडील लता कुंज या इमारतीमध्ये भाडेकरूंनी अनधिकृत बांधकाम केल्याने इमारत मालकाने पालिकेकडे तक्रार केली आहे.

मुंबई : बोरिवली पुर्वेकडील लता कुंज या इमारतीमध्ये भाडेकरूंनी अनधिकृत बांधकाम केल्याने इमारत मालकाने पालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र पालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांनी जेष्ठ नागरिक असलेल्या अर्जदारास पुन्हा तक्रारीची दखल घेणार नसल्याचे उत्तर देत बेदखल केले आहे. तसेच इमारतीमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाकडेही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून त्यांची तक्रार निकाली काढल्याचे, कळविल्याने ज्येष्ठ नागरिक सुभाष खिलारे हतबल झाले आहेत.

महत्त्वाची बातमी : फसवणूकीचे 71 लाख कसिनोमध्ये जुगारात उडवले, आरोपी अटकेत

बोरिवली पूर्वेकडील हनुमान मंदिराजवळ लता कुंज ही जुनी इमारत आहे. ही इमारत सुभाष खिलारे यांची असून येथे राहणाऱ्या भाडेकरूंनी त्यांची आणि महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत खिलारे यांनी महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार करून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतरही पालिकेने या बांधकामावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे खिलारे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे न्यायासाठी अर्ज केला. त्यांनी महापालिकेला योग्य ती कारवाई करण्याचे पत्र दिले. मात्र, पालिकेने आजवर या बांधकामावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

BIG NEWS - आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार, अर्णब गोस्वामी यांना तूर्तास दिलासा नाही

पालिकेने खिलारे यांना इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी इमारतीचे ऑडिट करून पालिकेकडे अहवाल सादर केला. यानंतरही पालिकेने या बांधकामावर कारवाई न करता, इमारतीची जबाबदारी मालकाची आहे, असे पत्र दिले. तसेच यापुढे केलेल्या अर्जाची दखल घेण्यात येणार नसल्याचे, पत्र पालिकेने खिलारे यांना दिले आहे. खिलारे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांना वयोमानानुसार धावपळ करणे शक्‍य होत नाही. यानंतरही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापुढे तक्रारीची दखल घेणार नसल्याचे, कळविल्याने ते हतबल झाले आहेत.

BIG NEWS  अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर, संजय राऊतांचा अमित शहांना टोला

नाहीतर उपोषणाला बसू... 

पालिका ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासोबतच पालिकेने धोकादायक इमारतीवर तोडक कारवाई करणे अपेक्षित आहे. यासाठीचा खर्च देण्याची तयारी दर्शविल्यानंतरही पालिका जबाबदारी घेण्यास तयार नाही. ही खंत वाटते. लोकप्रतिनिधींकडे याबाबत दाद मागितल्यानंतरही न्याय मिळत नसेल तर आम्ही करायचे काय? पालिका जर कारवाई करणार नसेल तर आम्ही पालिका कार्यालयाबाहेर उपोषणाला बसू असा इशारा खिलारे यांनी दिला आहे.

महत्त्वाची बातमी : कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या सुल्तान मिर्झाला NCB कडून अटक, मुंबईत धडक कारवाई

या प्रकरणाची माहिती मला नाही. याबाबतची माहिती घेउन उत्तर देण्यात येईल, असं - आर/सी वॉर्ड, सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे म्हणाल्यात. 

( संपादन - सुमित बागुल )

BMC officer ignored complaint of senior citizens and gave arrogant answers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC officer ignored complaint of senior citizens and gave arrogant answers