Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

BMC Pedestrians First Campaign: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेने नवी उपाययोजना केली आहे. पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविण्यात येणार असून निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
BMC

BMC

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील पदपथ सर्वसमावेशक, सुरक्षित आणि अडथळामुक्त करण्यासाठी महापालिकेने 'पादचारी प्रथम' अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे स्थानके, शाळा, रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरातील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी याबाबतच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com