भरती वेळी पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई पालिका सज्ज; महापौरांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

मुंबईत यंदा पावसाला लवकर सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांत पाऊस जुलैमध्ये सुरू होत होता. या वर्षी जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

मुंबई : भरतीच्या वेळी पाऊस झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याचा धोका आहे. ओहोटी सुरू होताच तात्काळ पाण्याचा निचरा केला जाईल, अशी ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना दिली.

BIG NEWS  - पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

मुंबईत यंदा पावसाला लवकर सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांत पाऊस जुलैमध्ये सुरू होत होता. या वर्षी जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. मुंबईत जोरदार पाऊस झाल्यास पाणी साचणाऱ्या भागांमध्ये उपसा पंप बसवण्यात येणार आहेत. भरतीच्या वेळी पाऊस झाल्यास पाणी साचणारच; मात्र ओहोटी सुरू होताच पंपिंग स्टेशनद्वारे साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा केला जाईल. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे, अशी ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

मशीनने नालेसफाई
पावसाळ्यापूर्वी करावयची नालेसफाईची कामे झाली आहेत. उर्वरित कामे मोठ्या मशीनच्या साहाय्याने सुरू असल्याची माहिती महापौरांनी दिली.

bmc is ready to drain the water if it collects during low tide in rainy season, testified the mayor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc is ready to drain the water if it collects during low tide in rainy season, testified the mayor