BMC : शाळांसाठी कृती आराखडा तयार, निर्जंतुकीकरण करण्यासाठी सज्ज

BMC
BMCsakal media

मुंबई : शाळा सुरु (school starts) करण्यासाठी महानगरपालिकेने कृती आराखडा (bmc plan) तयार केला आहे. पुढील सहा दिवसात सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण( school sanitization) करण्याची तयारी पुर्ण झाली आहे. त्याच बरोबर प्रत्येक शाळेच्या प्रवेश व्दारावर थर्मल स्क्रिनिंग (thermal screening) करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना (students) महिन्यातून दोन वेळा मोफत मास्कही (free masks) देण्यात येणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 18 ऑगस्ट पासून राज्यातील शाळा सुरु होण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे महानगर पालिकाही कामाला लागली आहे. पुढील सहा दिवसात शाळांच्या सर्व इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्या बरोबरच सर्व प्राथमिक तयार करण्यात येणार आहे.महानगर पालिकेच्या शाळांमध्ये सुमारे 3 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यी 10 हजारच्या आसपास शिक्षण आणि तेवढ्याच प्रमाणात शिक्षकेत्तर कर्मचारीही आहेत.तर,शाळांच्या 1 हजार 178 इमारती आहेत.अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागा कडून देण्यात आली.

BMC
BCOM: 'बँकिंग अँड इन्शुरन्स' सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर

पालिका शाळेच्या प्रत्येक वर्गात 40 ते 50 विद्यार्थी असल्याने वर्गांमध्ये सोशल डिस्टंक्‍सींग कसे पाळणार असा प्रश्‍न आहे.मात्र,किमान 1 मिटरचे अंतर राहील अशी खबरदारी घेऊनच वर्ग चालविण्यात येणार आहे.तसेच,विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन प्रशिक्षणात त्याबाबत माहिती दिली जात असल्याचे सांगण्यात आले.

ही सुविधा असणार

सॅनिटायझर,दोन विद्यार्थ्यांमध्ये एक मिटरचे अंतर,शाळेचे वेळोवेळी निर्जुंतुकीकरण,वैयक्तीक स्वच्छतेसाठी मुबलक पाणी.

पालिकेच्या शाळा

- विद्यार्थ्यी संख्या 2 लाख 78 हजार 498

शिक्षण - 10 हजार 420

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com