
मुंबई : अंधेरी पूर्वेकडील महापालिकेच्या शाळेत सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असलेल्या इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. विद्यार्थ्यांचे जीव रोजच्या रोज धोक्यात आले आहेत. शाळेचा आज पहिला दिवस असूनच विद्यार्थ्यांना तडे गेलेल्या भिंती आणि स्लॅब कोसळलेल्या वर्गखोल्यांमध्ये बसावे लागले. पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी याविरोधात आवाज उठविला असतानाही पालिकेच्या शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप आहेत.