

BMC
Esakal
मुंबई : हवामान बदलामुळे वाढणारा अतिवृष्टीचा धोका आणि समुद्राच्या वाढत्या पातळीपासून आर्थिक राजधानीचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहराचा ‘शहरी पूर जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम’ प्रभावीपणे राबवण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (एनडीएमए) आर्थिक सहाय्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला लवकरच तत्त्वतः मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ४६.६७ कोटींची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे.