Tree Cutting
sakal
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील आधीच कमी होत चाललेल्या हिरवळीवर मोठा घाला घातला जाणार आहे. या प्रकल्पासाठी धारावीतील आठ हजार झाडे बाधित होणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे धारावीतील झाडे तोडून त्याची कथित भरपाई म्हणून तब्बल ९० किमी दूर पालघर जिल्ह्यात ९० एकर जमिनीवर २२,९०४ झाडे लावण्याचा अजब दावा विकसक आणि पालिकेकडून केला जात आहे.