esakal | 'BMC ने इमेजपेक्षा खड्ड्यांवर लक्ष द्यावं', काँग्रेस आमदाराकडून घरचा आहेर
sakal

बोलून बातमी शोधा

'BMC ने इमेजपेक्षा खड्ड्यांवर लक्ष द्यावं', काँग्रेस आमदाराचा घरचा आहेर

'BMC ने इमेजपेक्षा खड्ड्यांवर लक्ष द्यावं', काँग्रेस आमदाराचा घरचा आहेर

sakal_logo
By
श्रेयस सावंत

मुंबई: "मुंबई महापालिकेने (bmc) आपली प्रतिमा सुधारण्यापेक्षा खड्ड्यांवर (potholes) जास्त लक्ष देऊन पैसा खर्च करायला पाहिजे" असा टोला काँग्रेस आमदार झिशान सिद्दकी (Zeeshan Siddique) यांनी मुंबई महापालिकेला लगावला आहे. खरंतर काँग्रेस (congress) हा महाविकास आघाडीच महत्त्वाचा घटक आहे. तरीही काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दकी यांनी महानगर पालिकेला हा टोमणा मारला आहे.

हेही वाचा: राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध? भाजपा एक पाऊल मागे घेणार?

"मुंबई महापालिकेने रस्त्याकडे लक्ष द्यावं, त्याच्या मॅनेजमेंटवर पैसे खर्च केले पाहिजेत. उगाच आपल्या प्रतिमेवर खर्च करुन काही फायदा होणार नाही. आम्ही महाविकास आघाडी सरकार मध्ये आम्ही जरी असलो तरीही, जे चुकीचं आहे, त्यावर आम्ही बोलणार. महानगर पालिकेत आम्ही स्वतंत्र लढणार आहोत" असे झिशान सिद्दकी यांनी सांगितले.

हेही वाचा: 'सीतेला पळवून नेणं हाच अत्याचार' डोंबिवली घटनेवर चित्रा वाघ यांचा संताप

झिशान सिद्दकी हा काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दकी यांचा मुलगा आहे. वांद्रयातून आमदार असलेल्या झिशान सिद्दकी यांनी मध्यंतरी लसीकरणावरुन शिवसेनेवर टीका केली होती. त्यांच्या वॉर्डमध्ये लसीकरण आयोजित करण्यात राजकारण होत असल्याने त्यांचे काही आक्षेप होते. त्यावरुन त्यांनी त्यावेळी शिवसेनेवर टीका केली होती. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र चूल मांडणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. झीशान यांच्याआधी सुद्धा काँग्रेसने मुंबई महापालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.

loading image
go to top