esakal | 'सीतेला पळवून नेणं हाच अत्याचार' डोंबिवली घटनेवर चित्रा वाघ यांचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra-Wagh-Sanjay-Raut

'सीतेला पळवून नेणं हाच अत्याचार' डोंबिवली घटनेवर चित्रा वाघ यांचा संताप

sakal_logo
By
श्रेयस सावंत

मुंबई: "रोज महिलांवर अत्याचार सुरू आहे. डोंबिवलीची (dombivali) घटनासमोर असताना कल्याणमध्ये अशीचं घटना घडली. ही विकृती कुठून येते? महाविकास आघाडी सरकार (mva govt) हे बलात्काऱ्यांना मोकाट सोड्याचं काम करत आहे" असा आरोप भाजपाच्या (bjp) नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी केला. "संजय राठोड केसमध्ये अजूनही कारवाई झालेली नाही. सर्वसामन्यांच्या प्रश्नावर या सरकारमध्ये एकी नाही. हे तिन्ही पक्ष बलात्काऱ्यांना वाचवत आहेत. संजय राठोड केस मध्ये अद्यापी एफआयआर झालेली नाही" या मुद्याकडे चित्रा वाघ यांनी लक्ष वेधले.

"मेहबूब शेखला अजूनही अटक केली नाही. बलात्काऱ्याला का पाठीशी घालता? बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलीस स्टेशनला येतो आणि त्याला अटक का केली गेली नाही हा प्रश्न मी उपस्थित करते. त्या पीडीतेला कसा त्रास दिला गेला? पोलिसांनी हे मी नाही तर न्यायाल्याने विचारले आहे" असे चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचा: एक एकर जमिनीला १८ कोटी रुपये देणे व्यवहार्य नाही - अजित पवार

"जर तपास झाला असता तर, संजय राठोड केसमध्ये पीडीतेला न्याय मिळाला असता. पोलिसांचा धाक राहिलेला नाही. महिलांना खूप भोगावं लागतय. महाबळेश्वरची घटना हे काय चाललं आहे? एक अधिवेशन भरवा हे आम्ही सांगितलं आहे, पण मुख्यमंत्री काही बोलत नाही, ही आहे का शिवशाही?" असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

हेही वाचा: राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध? भाजपा एक पाऊल मागे घेणार?

"संजय राऊत तुम्ही सरकारला प्रश्न विचारणार आहात का? आम्ही सगळ्या तपासांना सामोरं जाणार आहोत. महापौर ताई बोरिवलीला पोचलात. पण मग डोंबिवलीला का नाही गेल्या? सीतेला पळवून नेणं हाचं अत्याचार आहे" असे चित्रा वाघ म्हणाल्या

loading image
go to top