अरे वाह..! चक्क धारावीतील दोन कोरोना उपचार केंद्र बंद...

dharavi
dharavi
Updated on

मुंबई :  अडीच किलोमीटर चौरस क्षेत्रात पसरलेल्या धारावीत कोरोनाचे रुग्ण एप्रिललमध्ये वाढण्यास सुरुवात झाली. पाच एप्रिलनंतर प्रथमच एका दिवशी धारावीत केवळ पाच रुग्ण आढळले. या परिसरात एकंदर 2 हजार 189 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. जूनमधील रोज आढळत असलेल्या कोरोना रुग्णांची सरासरी संख्या वीसवर आली. वाढीचा दर 1.1 टक्के झाला आहे, यापूर्वी हा 4.3 टक्के होता. कोरोना रुग्णातील मृतांचे प्रमाण पाच टक्क्यावरुन 3.7 टक्क्यापर्यंत खाली आहे. धारावीत आत्तापर्यंत 81 जणांचे निधन झाले आहे, त्याचवेळी जूनमध्ये दहा जणांनी जीव गमावला आहे.

काही आठवड्यांपूर्वी धारावीतील कोरोनाचा धोका मुंबईला सर्वाधिक असल्याचे मानले जात होते, मात्र आता धारावीने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. एवढेच नव्हे तर आता धारावीतील दोन कोरोना उपचार केंद्र बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
 
लग्न सोहळ्यांच्या नव्या नियमांसह नवे पॅकेज; कॅटरर्स व्यवसायही लागला तयारीला...

बृहन्मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी चार प्रकारची केंद्र असतात. आता महापालिकेने धारावीतल दोन केंद्र बंद करण्याचे ठरवले आहे. त्यातील एक राजीव गांधी क्रीडा संकुलातील आहे. धारावीत रोखलेला कोरोना हा यंत्रणेचा मोठा विजय मानला जात आहे. धारावीतील लोकसंख्येची घनता एक चौरस किलोमीटर मागे 2 लाख 27 हजार 136 एवढी जास्त आहे. एप्रिलमध्ये 18 दिवसात रुग्ण दुपटीने वाढत होते. एप्रिलमधील वाढीचा दर 12 टक्के होता, तो मेमध्ये 4.3 टक्के तर जूनमध्ये 1.02 टक्के झाला. परिसरातील एकंदर 5 लाख 48 हजार 270 जणांची चाचणी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com