लग्न सोहळ्यांच्या नव्या नियमांसह नवे पॅकेज; कॅटरर्स व्यवसायही लागला तयारीला...

caterers
caterers

मुंबई : राज्य सरकारने 50 जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईत आता पुन्हा कॅटरर्सची कार्यालये खुली होऊ लागली आहेत. लग्न सोहळे व अन्य घरगुती सोहळ्यांसाठी कॅटरर्सवाले नियोजन करू लागले. ग्राहकांना संपर्क करून लग्नसाठीच्या पुढील तारखा व त्याचे नियोजन याबाबत कार्यालयात काम सुरू झाले. गेले तीन महिने ठप्प पडलेला व्यवसाय हळूहळू रुळावर येण्याची आशा या व्यावसायिकांना दिसून येत आहे. 

मार्च ते जून हे तीन महिने म्हणजे लग्नसराईचे दिवस. परंतु नेमकी याच काळा देशात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. लग्नाच्या बेडीत अडकणारी अनेक जोपड्यांची शुभमंगल सावधान पुढे ढकलण्यात आली. मात्र राज्य सरकारने पहिला अनलॉक जाहीर करता लग्न सोहळे सोशल डिस्टन्सिंग नियम पाळून पार पडता येतील, अशी परवानगी दिली. त्यामुळे यंदा लग्नाचा मुहूर्त टळणार म्हणून हिरमोड झालेल्या जोडप्यांना आनंदाची बातमी मिळाली. 50 लोकांच्या उपस्थिती लग्नसोहळ्यांसाठी कॅटरर्स व्यावसायिकांनी वेगळे पॅकेज तयार करत आहे.. सुमारे 30-40 हजार ते दोन लाखापर्यंत नवनवीन पॅकेज विविध कॅटरर्स, हॉल व्यावसायिकांकडून तयार करण्यात येत आहेत. 

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा विविध ठिकाणी नवीन नियमांसह लग्नसोहळे आयोजित करण्यात येत आहेत. नव्या नियमानुसार हे लग्न सोहळे पोलिसांच्या परवानगींनी सोशल डिस्टन्सिंग नियम पाळून पार पडत आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहेत. ई-पत्रिकासह आसन व्यवस्था, सॅनिटायझर, मास्क, स्वच्छता, जेवण्याची सुरक्षितता अशी सुविधा कॅटरर्सकडून देण्यात येत आहे. सध्यातरी लग्न हॉल नसून घरगुती स्वरूपात पार पडत आहे. नुकतेच बदलापूर येथे घरताच 40 कुटूंबियांच्या उपस्थित लग्न पार पाडले. त्या ठिकाणी मी फोटोग्राफर म्हणून काम केले. ही माझी लॉकडाऊननंतरची पहिलीच ऑर्डर होती. तर 27 जूनला आणखी एका लग्नाची ऑर्डर मिळाली आहे. त्यासाठी पोलिसांची परवानगी आणि राज्य सराकारचे सर्व नियमांचे पालन करून लग्न सोहळा पार पडणार आहे, असे फोटोग्राफर वैभव गडहिरे यांनी सांगितले. 

असे असणार नवे पॅकेज
शासकीय नियमांनुसार लग्न सोहळ्याचे आयोजन, सॅनिटायझर व थर्मल तपासणीची सुविधा, मास्क - सोशल डिस्टन्सिंग आधारित बैठक व्यवस्था, घराचे सॅनिटायझेशन,  समारंभाची जागा सॅनिटायिज करणे,  सजावट, हॉल व लॉनमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा, 50 लोकांचे जेवण, ब्राह्मणाची व्यवस्था, लग्न विधीचे सर्व सामान, आवश्यक असल्यास नातेवाईकसांठी लाईव्ह स्क्रीन, कामगारांचे थर्मल तपासणी, ग्लोज, मास्कसह ते सेवेत दाखल होणार आहेत.

गेले तीन महिने व्यवसाय ठप्प होताच. दोन दिवस झाले कार्यालय सुरू केले. आता नव्या नियमानुसार विवाह सोहळे कसे पार पडायचे याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी पॅकेज काय देयचे याबाबतही माझ्या सहकाऱ्यासोबत बोलणे सुरू आहे. येत्या आठवड्यातभरात नव नियमांसह नवी पॅकेज तयार करण्यात येईल. सध्यातरी लग्नाची ऑर्डर नाही मात्र घरगुती छोट्या सोहळ्याची ऑर्डर येण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारचे सर्व नियम पाळूनच आम्ही ग्राहकांना सेवा देणार आहोत.
- मयुर पाटील, मयुर कॅटरर्स.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com