सिटि सेंटर मॉलचे विज, पाणी तोडले; बेकायदा बांधकाम हटवत नाही तोवर मॉल बंद

सिटि सेंटर मॉलचे विज, पाणी तोडले; बेकायदा बांधकाम हटवत नाही तोवर मॉल बंद

मुंबई : नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलमध्ये 344 गाळे बांधल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात 689 क्रमांकाच्या गाळ्यातील सदोष विद्युत यंत्रणेमुळे आग लागल्याची माहिती माहिती महानगरपालिका प्रशासनाने आज स्थायी समितीपुढे सादर केली. या मॉलचे विज पाणी कापण्यात आले आहे. मात्र, जोपर्यंत बेकायदा बांधकाम हटवले जात नाहीत तोपर्यंत मॉल सुरु करण्याची परवानगी देऊ नये असे निर्देश आज स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहे.

सिटी सेंटर माॅलला 22 सप्टेंबररोेजी आग लागली होती. ही आग तब्बल 56 तासांनी अटोक्यात आली. मुंबईत सर्वाधिक काळ पेटत राहीलेली आग असून त्याचे पडसाद आज पुन्हा स्थायी समितीत उमटले. या आगीबाबत आज स्थायी समितीत प्रशासनाने माहिती सादर केली आहे. त्यात, गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या मॉलची महानगर पालिकेच्या पथकाने पाहाणी केली होती. तेव्हा अग्नीप्रतिबंधक यंत्रणेत उणिवा आढळल्याने मॉल व्यवस्थापनाला नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षीच नोव्हेंबर महिन्यात मॉल व्यवस्थापनाने यंत्रणा सुस्थीतीत असल्याचा अहवाल सादर केला होता. या वर्षीच्या २९ जुलैरोजी देखील मॉल व्यवस्थापनाने अग्निसुरक्षेचे मान्यता प्राप्त कंपनीकडून ऑडीट करुन मॉल सुरक्षीत असल्याचा अहवाल दिला होता.

आगीबाबात अग्निशमनदला मार्फत तपास करण्यात आला असून आग दुसऱ्या मजल्यावरील गाळा क्रमांक 689 मधील सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागली असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती प्रशासनाने स्थायी समितीत मांडली आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव रक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मधील तरतुदीनुसार या मॉलचे विज आणि पाणी कापण्यात आले आहे असेही प्रशासनाकडून नमुद करण्यात आले आहे.

स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी पुन्हा मॉलमधील बेकायदा बांधकामांचा मुद्दा उपस्थीत केला. पालिकेच्या नोंदीनुसार मॉलमध्ये 344 गाळ्यांना परवानगी दिली आहे. प्रत्यक्षात 1344 गाळे असल्याचा दावा रवी राजा यांनी केला. तसेच आता बेकायदा बांधकामावर कारवाई होत नाही तो पर्यंत मॉल सुरु करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली. यावर अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बेकायदा बांधकाम पाडत नाही तो पर्यंत माॅल सुरु करण्याची परवानगी देऊ नये असे निर्देश दिले आहेत.

BMC standing committee decided to cut water and electricity of city center mall

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com