esakal | BMC : महापालिकेचे विद्यार्थ्यी गिरवणार रोबोटीक्सचे धडे | Robotics
sakal

बोलून बातमी शोधा

Robotics

BMC : महापालिकेचे विद्यार्थ्यी गिरवणार रोबोटीक्सचे धडे

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : महानगरपालिकेच्या (BMC) विद्यार्थ्यांना भविष्यात रोबोटीक्‍सचे धडे (robotics training) मिळणार आहे. प्रायोगिक तत्वावर रोबोटीक्‍सचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना (students) देण्यास प्रशासनाने (Government) होकार दिला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानांची (technical education) नव्या वाटा खुल्या होणार आहेत.

हेही वाचा: आठ लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या नोकराला अटक

महानगरपालिकेने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.विद्यार्थ्यांना टॅब देण्या बरोबरच आता डिजीटल क्‍लासरुमही तयार करण्यात येत आहे. त्यापुढे जाऊन विद्यार्थ्यांना रोबोटीक्‍स सारख्या विषयाचे शिक्षण देण्याची तयारीही प्रशासनाने दाखवली आहे. प्रायोगिक तत्वावर मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी रोबोटीक्‍स विषयाचा कार्यशाळा घेतल्या जातील. त्यानंतर सर्व माध्यमांच्या शाळांसाठी या कार्यशाळा घेतल्या जातील.या विषयात विशेष ज्ञान असलेल्या शिक्षकांची भेट तत्वावर नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने शिक्षण समितीच्या पटलावर मांडली आहे.

शिवसेनेच्या सदस्य शितल म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांसाठी रोबोटीक्‍सचे प्रशिक्षण देण्याची ठरावाची सुचना मांडली होती.विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना या विषयाचा फायदा होईल.रोबोटीक्‍स वापर सर्वच क्षेत्रात होत आहे.विद्याथ्यी दशेपासून याबाबत माहिती मिळणे गरजेचे आहे.पालिकेचे विद्यार्थ्यी हे आर्थिक दुर्बल घटकातील असल्याने त्यांना स्वखर्चाने हा विषय समजून घेणे शक्‍य नाही.त्यामुळे पालिकेने पुढाकार घेण्याची मागणी म्हात्रे यांनी केली होती.त्यावर प्रशासनाने रोबोटीक्‍स विषयाचा कार्यशाळा सुरु करण्याची तयारी दाखवली आहे.

अशी तयार होणार कार्यशाळा

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची एक समिती तयार करण्यात येईल.या समितीकडून प्रशिक्षीत शिक्षकांची नियुक्ती केली जाईल.तसेच विद्यार्थ्यांसाठी या संदर्भातील पुस्तके उपलब्ध करुन दिली जातील.त्यासाठी आवश्‍यक उपकरणांची खरेदीही केली जाईल.

हेही वाचा: शिक्षक भारती करणार आझाद मैदानात बेमुदत साखळी उपोषण

आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणासाठी पालिकेचे प्रयत्न

-भारत सरकारच्या नीती आयोगाच्या शिफारशी नुसार पालिकेच्या पाच शाळांमध्ये अटल टिकरींग लॅब तयार करण्यात आली.या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची रुची निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.सृजनशिलता,जिज्ञासा,प्रयोगशिलता,विचार करण्याची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न या प्रयोग शाळेमार्फत केले जातात.याच तत्वावर इतर 25 शाळांमध्ये अशी प्रयोग शाळा सुरु करण्याचे काम सुरु आहे.

-या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना परिक्षण आणि त्रुटी पध्दतीने (लर्निंग बाय ट्रायल ऍन्ड एरर मेथड) आधुनिक माहिती तंत्रज्ञान संबंधी साधानांचा प्रत्यक्ष वापर करणे,संगणक अज्ञावलीची कार्यपध्दती माहिती करुन देणे असे प्रशिक्षण दिले जाते.

-महानगर पालिकेने आता शाळांमध्ये डिजीटल क्‍लास रुम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.यात डिजीटल फळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.पाठ्यक्रमीत अभ्यासक्रमा बरोबर विषयाची अवांतर माहितीही विद्यार्थ्यांना यामुळे मिळणार आहे.

loading image
go to top