esakal | मुंबईतल्या सोसायट्यांना पालिकेनं म्हटलं, तयार राहा! कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतल्या सोसायट्यांना पालिकेनं म्हटलं, तयार राहा! कारण...

प्रशासनानं गृहनिर्माण संस्थांना सोसायटीच्या आवारात आपत्कालीन आयसोलेशनची सुविधा उभारण्यासह उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईतल्या सोसायट्यांना पालिकेनं म्हटलं, तयार राहा! कारण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडाही दररोज वाढतो. अशातच निवासी इमारतींमधील कोरोना प्रकरणांची संख्या वाढतेय. के पश्चिम वॉर्डमधल्या प्रशासनानं गृहनिर्माण संस्थांना सोसायटीच्या आवारात आपत्कालीन आयसोलेशनची सुविधा उभारण्यासह उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच ज्येष्ठ नागरिक आणि 15 वर्षाखालील मुलांना घरातच ठेवण्यास सांगितलं आहे. 

वैद्यकीय परिक्षा रद्द करा; अन्यथा आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता... वाचा सविस्तर...

सहाय्यक मनपा आयुक्त विश्वास मोते यांनी 16 जूनला परिपत्रक जारी केलं आहे. हे परिपत्रक के वेस्ट वॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आलंय. तसंच व्हॉट्सअ‍ॅपवर रहिवाशांच्या संघटनांकडे पाठविण्यात आले आहे आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीदरम्यान ते सोसायट्यांकडे देण्यात आलंय. 

के पश्चिम प्रभागात अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, लोखंडवाला, ओशिवारा, वर्सोवा आणि जुहूचा काही भाग आहेत. अल्पविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना अधिक काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. सोसायट्यांना बीएमसीचे कर्मचारी जेव्हा स्क्रीनिंगसाठी इमारतीत भेट देण्यास येतात तेव्हा सहकार्य करण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन, कोणामध्ये सौम्य लक्षणे असल्याच ते तात्काळ लक्षात येईल. संबंधितांची लवकर चाचणी करता येईल. ज्येष्ठ नागरिक आणि 15 वर्षाखालील मुलांनी काटेकोरपणे घरीच राहावे, असे सल्लागारांनी म्हटलं आहे. 

MMRDA चं दुसरं कोविड रुग्णालय तयार; कोरोना रुग्णांना मिळतील 'या' सुविधा.. 

सल्लागार इमारतींना जेथे जेथे शक्य असेल तेथे आयसोलेशन सुविधा स्थापित करण्यास सांगितलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत सोसायटीच्या आवारात ऑक्सिजन सिलेंडर्स ठेवण्यासही सांगण्यात आलं आहे. सोसायटी आवारात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे परीक्षण करेल आणि इमारतीच्या खासगी सुरक्षेद्वारे ओडोमीटर आणि थर्मल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी करण्यात येईल. 

नोटीसमध्ये पुढील सल्ला देण्यात आला आहे की सीलबंद इमारतीत किंवा इमारतीत सीलबंद भागात कोणत्याही मोलकरीण, भाजीपाला / फळ / किराणा विक्रेते, धोबी किंवा "इतर सेवा पुरवठादार" यांना परवानगी दिली जाऊ नये. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार इत्यादीच्या आपत्कालीन दुरुस्तीची कामे वगळता. प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. आतील किंवा बांधकामासारख्या नवीन कामांना परवानगी नाही, असे नोटिसात म्हटलं आहे. 

BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...

'अपमान करू नका'

16 जूनच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, सर्व सदस्यांना विनंती आहे की ज्या परिसरात कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असतील आणि ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं असेल त्यांना योग्य वागणूक द्यावी. नम्र विनंती - कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांसोबत भेदभाव करू नका आणि त्यांचा अपमान करु नका.

loading image
go to top