

BMC heritage Trees Cutting
Esakal
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मालाडमध्ये नियमांना हरताळ फासत चक्क 'बॅकडेटेड' नोटीस लावून हेरिटेज झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ११ मार्चची तारीख असलेली नोटीस प्रत्यक्षात २३ एप्रिल रोजी लावली गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज रहिवाशांनी समोर आणले असून, या 'घोटाळ्या'मुळे पालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.