BMC : डोंगराळ भागात पाणी पोहोचवण्यासाठी योजना; वाचा सविस्तर | water supply update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMC : डोंगराळ भागात पाणी पोहोचवण्यासाठी योजना; वाचा सविस्तर

मुंबई : डोंगराळ भागातील वस्त्यांना (Society in forest) नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने (BMC) आता उद्यानात (Garden) पाण्याच्या भूमिगत टाक्या (water tank construction) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य जलकुंभातून आलेले पाणी या टाक्यांमध्ये साठवून ते पम्पाच्या साह्याने डोंगराळ भागातील घरांपर्यंत पोहचवले जाणार आहे.

हेही वाचा: मुंबई : 26 /11 च्या शहिदांना मुंबई पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबईतील वस्त्या डोंगराळ भागात पोहचल्या आहेत. पण जलकुंभांची उंची या वस्त्यांच्या खाली असल्याने पाणी वस्त्यांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे नेहमीच या वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या असते. मुंबईतील अनियमित पाणीपुरवठ्यामुळे काही दिवसांपूर्वी स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली होती. यानंतर पालिकेने वॉर्ड स्तरावर अनियमित पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण करून कारणे शोधली.

यामध्ये एल वॉर्डमधील उंच भागात कमी दाबामुळे पाणी पोहचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कुर्ला चांदवली भागातील उंच भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी उद्यानांमध्ये भूमिगत आरसीसी टाक्या बांधून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

शेवटच्या टोकाला असलेल्यांना नेहमीच समस्या

मुंबईत पाणीपुरवठ्यासाठी २५० हून अधिक झोन ठरविण्यात आले आहेत. उंच भागातील जलकुंभातून नैसर्गिक दाबाने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या ग्राहकांना नेहमीच पाण्याची समस्या भेडसावत असते.

loading image
go to top