मुंबईत 'या' भागातल्या तब्बल ११ इमारतींमध्ये होणार क्वारंटाईन सेंटर?महापालिकेचा उच्च न्यायालयात अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. मागच्या ५ दिवसांमध्ये मुंबईत रुग्णांची संख्या झपाटयानं वाढली आहे. त्यामुळे आता प्रशासनाला अधिक जागेची आणि क्वारंटाईन सेंटरची गरज पडत आहे. 

मुंबई: मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. मागच्या ५ दिवसांमध्ये मुंबईत रुग्णांची संख्या झपाटयानं वाढली आहे. त्यामुळे आता प्रशासनाला अधिक जागेची आणि क्वारंटाईन सेंटरची गरज पडत आहे. 

हेही वाचा: बाप रे! तब्बल १ लाख रुग्णांमागे अवघे 'इतके' डॉक्टर..पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटरवर

 कोरोनाचा धोका वाढत असताना आता माहुल येथील 11 इमारतींंमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याची परवानगी महापालिकेने मागितली आहे. त्यासाठी प्रशासनाने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

'घर बचाओ घर बनाओ आंदोलन' संघटनेने तुरुंगांमधील कैद्यांसाठी जनहित याचिका केली आहे. या याचिकेत महापालिकेच्या वतीने अर्ज करण्यात आला. एम पश्चिम प्रभागातील कोरोना रुग्णांची संख्या 21 मे रोजी 809 होती, ही संख्या 31मेपर्यंत 2900 वर जाण्याची शक्यता आहे. 

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका शाळांमध्ये अडकल्या; निकालावर होणार परिणाम..

संशयित रुग्णांच्या संख्येतही 27 हजारांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, असे या अर्जात म्हटले आहे. त्यामुळे माहुल येथे क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा विचार असून, तयारीसाठी एक-दोन आठवडे लागतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. याबाबत महाधिवक्ता मंगळवारी बाजू मांडतील, असेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. वायुप्रदूषणाचे मोठे प्रमाण असल्याने माहुल परिसरात क्वारंटाईन केंद्रे उभारू नयेत, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.

bmc will asked for permission of high court to make quarantine center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc will asked for permission of high court to make quarantine center