बाप रे! तब्बल १ लाख रुग्णांमागे अवघे 'इतके' डॉक्टर..पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटरवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

मुंबई: मुंबईचा पुर्व उपनगराचा भाग गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत आहे.महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयाचा विस्तारही किमान 10 वर्षांपासून कागदावरच असून या भागात 1 लाख नागरीकांसाठी उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयात अवघे 21 डॉक्‍टर उपलब्ध आहेत.

मुंबई: मुंबईचा पुर्व उपनगराचा भाग गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत आहे.महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयाचा विस्तारही किमान 10 वर्षांपासून कागदावरच असून या भागात 1 लाख नागरीकांसाठी उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयात अवघे 21 डॉक्‍टर उपलब्ध आहेत.

मुलूंड पश्‍चिमेला असलेल्या अगरवाल रुग्णालयाच्या विस्ताराचा आराखडा महानगर पालिकेने किमान 10 वर्षांपुर्वी तयार केला होता.मात्र,गेल्या वर्षभरापुर्वी रुग्णालयाच्या विस्ताराचे काम सुरु झाले.120 खाटांच्या रुग्णालयाचा विस्तार करुन येथे 450 खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार आहे.त्याच बांधकाम सुरु झाले होते.मात्र,आता ताळेबंदीमुळे हे कामही थांबले आहे.तर,गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचा विस्तारही असाच दहा वर्षांपासून रखडला आहे.

हेही वाचा: मुंबईत तयार होणार भारतातला पहिलावहिला अनोखा पूल..भाईंदर स्थानकाला मिळणार नवी बळकटी.. 

सध्या 210 खाटांचे असलेले हे रुग्णालय 580 खाटांचे करण्यात येणार आहे.गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या कामाचे भुमिपूजन झाले.2009-10 मध्ये महानगर पालिकेने उपनगरीय रुग्णालयांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.या दोन्ही रुग्णालयांसाठी 2017 पासून महानगर पालिका निवीदा मागवत होती.

"मुलूंडच्या अगरवाल रुग्णालयाचा विस्तार करण्यासाठी स्वत: 2013 पासून प्रयत्न करत आहे.सर्व स्तरावर बैठका आंदोलने झाली.आता जर हे रुग्णालय तयार असते तर कोविडच्या साथीत त्याचा चांगला वापर करता असता.असे स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले.भांडूप येथेही सुपरस्पेशालीटी रुग्णालय महानगर पालिका उभारण होती.मात्र,सध्या हे रुग्णालयाही कागदावरच आहे.

महापालिकेच्या 2019-20 या वर्षाच्या कार्यानुरूप अहवाला नुसार पुर्व उपनगरातील आठ रुग्णालयात 650 डॉक्‍टर उपलब्ध आहे.तर,2011 च्या जनगणनेनुसार पुर्व उपनगराची लोकसंख्या 30 लाख 85 हजार 411 आहे.त्यानुसार प्रत्येक 1 लाख नागरीकांसाठी पालिका रुग्णालयात अवघे 21 डॉक्‍टर उपलब्ध आहेत.

उपनगरीय रुग्णालयात प्रामुख्याने डेंगी,मलेरीया तसेच इतर साथीचा आजारांचा भार असतो.तसेच लहान मोठ्या आजारासाठी रुग्ण उपनगरीय रुग्णालयातच जात असतात.मात्र,अपुऱ्या डॉक्‍टरांमुळे पुर्व उपनगरातील रुग्ण सेवेचा बोजवार उडाला आहे.
कुर्ला येथे आता पर्यंत अडीज हजारच्या आसपास कोविड रुग्ण आढळले आहेत.तर,चेंबूर,गोवंडी ,घाटकोपर या भागातील रुग्णसंख्या 1600 हून अधिक आहे.तर,भांडूप मध्ये आता पर्यंत 1461 रुग्ण आढळले आहेत.पण,या भागात रुग्णवाढीचा वेग 7.8 टक्के आहे.

हेही वाचा: मुंबईतील सर्वात जास्त डेंजर हॉट स्पॉट अवघ्या २ दिवसात ६ वरून ८ वर, वाचा कुठे किती रुग्ण...

पुर्व उपनगरातील रुग्णालय:

-कुर्ला भाभा - खाटा 326,डॉक्‍टर 150, परीचारीका 172
-घाटकोपर राजावाडी - खाटा 596, डॉक्‍टर 298, परीचारीका 121
-मॉं चेंबूर - खाटा -71,डॉक्‍टर 25, परीचारीका 41
-गोवंडी शताब्दी - खाटा 210, डॉक्‍टर 45 , परीचारीका 98
-संत मुक्ताबाई घाटकोपर - खाटा 109, डॉक्‍टर 31, परीचारीका 58
-क्रांतीवर महात्मा ज्यातिबा फुले रुग्णालय विक्रोळी - खाटा आकडे उपलब्ध नाहीत, डॉक्‍टर 42 , परीचारीका 98
-अगरवाल रुग्णालय मुलूंड - खाटा 110, डॉक्‍टर 59, परीचारीका 120
-स्वातंत्रविर वि.दा.सावरकर रुग्णालय - खाटा 100, डॉक्‍टर 105 , परीचारीका 63

there are 21 doctors behind every 1 lac patients read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there are 21 doctors behind every 1 lac patients read full story