esakal | भाड्याच्या इलेक्ट्रीक कारसाठी BMC खर्च करणार १ कोटी ६२ लाख

बोलून बातमी शोधा

भाड्याच्या इलेक्ट्रीक कारसाठी BMC खर्च करणार १ कोटी ६२ लाख
भाड्याच्या इलेक्ट्रीक कारसाठी BMC खर्च करणार १ कोटी ६२ लाख
sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: महानगर पालिका अतिमहत्वाच्या पदाधिकाऱ्यांसाठी पाच इलेक्ट्रीक कारर्स आठ वर्षांसाठी एनर्जी इफिशियन्सी सर्व्हीसेस लिमिटेड या केंद्र सरकार पुरस्कृत कंपनीकडून भाड्याने घेणार आहे. या भाड्यापोटी महानगर पालिका आठ वर्षात 1 कोटी 62 लाख रुपये खर्च करणार आहे. प्रत्यक्षात या कारचा किमान दर 14 लाख रुपये असून प्रत्येक वाहनावर आठ वर्षाच्या भाड्यापोटी महानगर पालिका 32 लाख 48 हजार रुपये खर्च करणार आहे.

महानगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या वाहनाबद्दल तक्रार केली जाते. त्यामुळे आता सभागृह नेत्या, विरोधी पक्ष नेते तसेच पालिकेच्या काही समितीच्या अध्यक्षांसाठी महानगर पालिका नव्या गाड्या भाड्याने घेणार आहे. या टाटा नेक्सॉन इवी एक्स झेड प्लस या इलेक्ट्रीक कारर्स महानगर पालिका ईईएसएल या कंपनीकडून भाड्याने घेणार आहे. या भाड्यापोटी पहिल्या वर्षी महानगर पालिका प्रत्येक वाहानासाठी 27 हजार रुपये मोजणार आहे तर दरवर्षी या भाड्यात वाढ होणार असून आठव्या वर्षी हे भाडे 37 हजार 992 रुपयां पर्यंत जाणार आहे.

हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! लॉकडाउन गाईडलाईन्सचा 'हा' मेसेज करू नका फॉरवर्ड

आठ वर्षांसाठी महानगर पालिका या वाहानांच्या भाड्यावर 1 कोटी 62 लाख रुपये खर्च करणार असून सर्व करांसह हा खर्च 1 कोटी 68 लाखापर्यंत जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला जाणार आहे. टाटाच्या या वाहानांची किमान किंमत 14 लाखापर्यंत आहे. प्रत्येक वाहानाच्या भाड्या पोटी महानगर पालिका 32 लाख 48 हजार रुपयांचा खर्च करणार आहे.

हेही वाचा: शेवटचं मंगलाष्टक सुरु असताना अचानक झाली 'त्यांची' एंट्री; लग्नमंडपात उडाली तारांबळ; अखेर...

महानगर पालिका साधारण दिवसाला 900 ते 1300 रुपये या वाहानांच्या भाड्यासाठी मोजणार आहे. मात्र, या वाहनांसाठी महानगर पालिका स्वत:चा चालक नियुक्त करणार आहे. महानगर पालिका सध्या खासगी कंपन्यांकडून भाड्याने वाहने घेते, त्यासाठी दिवसाला 3 ते 3500 रुपये शुल्क कंत्राटदाराला देते. मात्र,यात चालकाचाही समावेश असतो.

केंद्रीय उर्जा मंत्रालयाने 2030 पर्यंत 100 टक्के विद्युत वाहाने वापरण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. इलेक्ट्रीक वाहानांचा वापर वाढावा म्हणून ईईएसएल या कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीने राज्य सरकारच्या विविध विभागांनाही इलेक्ट्रीक वाहाने भाड्याने दिली आहेत असेही प्रशासनाने या प्रस्तावात नमुद केले आहे.