राज्यातील विद्यार्थांसाठी BMCचे ऑनलाईन वर्ग खुले; शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

तेजस वाघमारे
Friday, 18 September 2020

मुंबई महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा फायदा राज्यातील सर्व शाळांना करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा फायदा राज्यातील सर्व शाळांना करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील अन्य शाळांतील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या ऑनलाईन वर्गामध्ये प्रवेश घेण्याची मुभा दिली आहे.

कंपन्यांच्या कर्ज चक्रव्युहामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

महापालिकेच्या शाळांत राज्य मंडळाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू या चार माध्यमांचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. हे वर्ग प्रशिक्षित शिक्षकांमार्फत घेण्यात येतात. या वर्गामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना पालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर ‘online admission from for MCGM school’ या लिंकवर अर्ज करावा. विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना ऑनलाईन वर्गात उपस्थित राहण्यासाठी लिंक व पासवर्ड देण्यात येते.  पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी दररोज सकाळी 8 वाजल्यापासून 45 मिनिटांच्या दोन तासिका आणि नववी व दहावीसाठी चार तासिका होतात.

राज्य सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थिती शिथिल करा; कर्मचारी मध्यवर्ती महासंघाची मागणी

शिक्षण विभागाने आता अन्य जिल्ह्यातील शाळांनाही या वर्गांचा उपयोग करण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार प्रवेश मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वर्गात नियमित उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन वर्गाची सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMCs online classes open for students in the state